मुंबई : ए दिल है मुश्कीलच्या समर्थनार्थ आता बॉलीवूड मैदानात उतरलं आहे. जर बंदीच घालायची असेल तर फक्त सिनेमांवर नको, पाकिस्तानबरोबरच्या व्यापारावरही बंदी घाला, असं वक्तव्य अभिनेता अभय देओलनं केलं आहे. बंदी घातल्यामुळे आपल्या जवानांना मदत होणार असेल तर मीही या बंदीचं समर्थन करीन असंही अभय म्हणाला आहे.
'ए दिल है मुश्कील'चं शूटिंग सुरु असताना भारत-पाकिस्तानमधलं वातावरण चांगलं होतं. करण जोहरनं काहीच चुकीचं केलं नाही. त्यानं कायद्याचा भंग केला नाही. पाकिस्तानी कलाकारांना भारत सरकारनंच व्हिजा दिला असल्याचं दिग्दर्शिका झोया अख्तर म्हणाली आहे.
'ए दिल है मुश्कील'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान आहे. पण उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. चित्रपटगृहांमध्ये 'ए दिल है मुश्कील' रिलीज होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा मनसेनं घेतला आहे.
पाहा काय म्हणाला अभय देओल
#WATCH: "If you want to ban anything to do with Pak,then go the distance. Don't just ban filmmakers", says Abhay Deol on #ADHM controversy pic.twitter.com/OiGMTRUwu8
— ANI (@ANI_news) 20 October 2016