दिलवालेचं पहिलं गाण रिलीज, शाहरुख-काजोलचा रोमान्स

शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रितिक्षीत दिलवाले या चित्रपटाचं पहिलवहिलं गाणं गेरुआ अखेर रिलीज झालंय. या गाण्यातून शाहरुख-काजोल यांचा रोमान्स दाखवण्यात आलाय. हे गाणं पाहिल्यास तुम्हाला नक्कीच कभी खुशी कभी गम चित्रपटातील सूरज हुवा मथ्थम हे गाणं आठवल्याशिवाय राहणार नाही. 

Updated: Nov 19, 2015, 11:23 AM IST
दिलवालेचं पहिलं गाण रिलीज, शाहरुख-काजोलचा रोमान्स title=

मुंबई : शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रितिक्षीत दिलवाले या चित्रपटाचं पहिलवहिलं गाणं गेरुआ अखेर रिलीज झालंय. या गाण्यातून शाहरुख-काजोल यांचा रोमान्स दाखवण्यात आलाय. हे गाणं पाहिल्यास तुम्हाला नक्कीच कभी खुशी कभी गम चित्रपटातील सूरज हुवा मथ्थम हे गाणं आठवल्याशिवाय राहणार नाही. 

पाहा हा व्हिडीओ

 

शाहरुख आणि काजोलची जोडी बॉलीवूडमधील हिट जोड्यांपैकी एक आहे. दोघांनी बाजीगर, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कभी खुशी कभी गम आणि माय नेम इज खान चित्रपटात एकत्र काम केलंय.

पियानोच्या सुरातील गेरुआ गाणे

 

रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख-काजोलसह वरुण धवन आणि कृती सेनन ही जोडीही दिसणार आहे. चित्रपटात वरुण शर्मा, जॉनी लिव्हर आणि संजय मिश्रा या कलाकारांनीही काम केलंय. येत्या १८ डिसेंबरला दिलवाले रिलीज होतोय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.