फिल्म रिव्ह्यू : 'क्लासमेटस्'ची यारी-दोस्ती, मज्जा अन मस्ती

Updated: Jan 17, 2015, 02:40 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'क्लासमेटस्'ची यारी-दोस्ती, मज्जा अन मस्ती title=

 

चित्रपट : क्लासमेटस् (मराठी सिनेमा)
दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार
कलाकार : अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सुयश टीळक

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'क्लासमेट्'स हा सिनेमा या विकेंडला रुपेरी पडद्यावर झळकलाय. मराठी फिल्म इंडस्ट्रीतला एक बहुचर्चित आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणाऱ्या या सिनेमाची अनेक प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. या सिनेमाची उत्सुकता सगळ्यांनाच होती. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, सुशांत शेलार, सुयश टिळक आणि पल्लवी पाटील अशा मल्टीस्टारर 'क्लासमेटस्'ची कथाही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शन जाते.

कथानक : 
कॉलेज विश्वावर आधारित क्लासमेटस् हा सिनेमा आहे. अनेक वर्षांपासून बिछडलेले मित्र एका रियुनियनच्या निमित्तानं पुन्हा भेटतात. पुन्हा त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो... आणि मग हा सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो.

ही कहाणी आहे 'इम्पेरिअल कॉलेज'च्या १९९५ सालच्या एका बॅचची... त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांची... त्या मजा-मस्तीची... हे सगळे क्लासमेटस् २० वर्षांनंतर पुन्हा एकदा भेटतात आणि अचानक त्यांच्यातला एक मित्र टेरेसवरुन खाली पडतो... तो खरंच खाली पडतो की त्याला मारण्याचा डाव रचला जातो??  या सगळ्या गोष्टींचा उलगडा सिनेमाच्या शेवटाला कळतो... थोडक्यात कॉलेजची धम्माल, मज्जा मस्ती, त्याचबरोबर रहस्यमयी अशा अनेक पैंलुंभोवती या सिनेमाची कथा फिरते.
 
अभिनय
सुरुवात करुया अंकुश चौधरीपीसून... अकुंशनं या सिनेमात एक खूप हटके रोल केलाय... असं म्हणता येणार नाही पण त्यानं जे काही केलंय ते छान झालंय..खरंतर या सिनेमातली त्याची भूमिका बघून कुठेतरी पुन्हा दुनियादारीतला त्याचा तो शेड आठवतो. पण यात त्याच्या रोलला भरपूर वाव असल्यामुळे त्यानं तो जास्तीत जास्त रंगवण्याचा प्रयत्न केलाय.
 
सई ताम्हणकर या नटीसाठी हा सिनेमा एक इमेज ब्रेकर ठरणार आहे. तिची आजवरची ग्लॅमडॉल, हॉट, ग्लॅमरस या इमेजमधून ती बाहेर पडताना दिसतेय. अप्पू नावाचं  कॅरेक्टर ती यात साकारतेय. तोंडात शिवी आणि हातात हॉकी स्टिक घेऊन एका 'टॉमबॉय' ती या सिनेमात दिसतेय. 
 
सचित पाटीलनंही यात एक हटके भूमिका साकारली आहे.. एक शांत, शार्प आणि फोकस्ड तरुणाची भूमिका त्यानं यात पार पाडली असून त्याची कामगिरीही उल्लेखनीय आहे... खरंतर त्याचा रोल इतका डॅशिंग  आहे की हे कॅरेक्टर पाहिल्यानंतर त्याची फिमेल फॅन फोलोईंगमध्ये वाढच होणार आहे. 
 
सिद्धार्थ चांदेकरनंही या सिनेमात एक यापूर्वी कधीही न साकारलेली साकारलेली अशी व्यक्तिरेखा बजावली आहे.  त्याचं कॅरेक्टर खरंच भाव खाऊन जातं. हा सिनेमा त्याच्यासाठीही खूप काही देऊन जाणारा ठरणार आहे. 
 
सोनाली कुलकर्णीनं यात एक बिनधास्त टॅलेन्टेड तरुणीची भूमिका साकारली आहे. नेहणीप्रमाणे तिच्या डान्सची खास झलक यातही अनुभवायला मिळते. 
 
सुशांत शेलार या नटानंही त्याच्या वाटेला जे काही आलंय ते उत्तम पार पाडलंय. प्रताप, जो यांच्यातलाच एक क्लासमेट असतो पण त्यांच्या गँगमध्ये सामील होण्याचं धाडस तो कधी करत नाही. त्यानं साकारलेलं प्रताप पाटील हे कॅरेक्टर खूपच चांगलं जमलंय. 
 
सुयश टीळकचा क्लासमेट मधला रोल छोटा जरी असला तरी तो चांगला झालाय..
 
दिगदर्शन :
आदित्य सरपोतदारनं क्लासमेट्सचं दिगदर्शन केलंय.. एक मलटीस्टारर सिनेमा करणं त्यात कॉमेडी, रोमान्स, ड्रामा, अॅक्शन, सस्पेन्स अशा सगळ्या एलिमेंटसचा मसाला तयार करणं खरं तर सोपं नाही.. पण आदित्यनं हे चॅलेंज स्वीकारलं आणि एक वेगळा सिनेमा देण्याचा प्रयत्न केलाय. या सगळ्या एलिमेंटसची भेळ तयार करुन त्याची योग्यरीत्या मांडणी करण्यात तो बऱ्यापैंकी यशस्वी झालाय.
 
शेवटी काय तर...
या सिनेमाचं वैशिष्ट्यं म्हणजे यातले डायलॉग्स... क्षितीज पटवर्धननं क्लासमेट्स या सिनेमाचे डायलॉग्स लिहिले असून, यातल्या प्रत्येक डायलॉगला वेटेज आहे. काही दिवसांतच हे संवाद नक्कीच तरुणाईच्या तोंडून ऐकायला मिळाले तर यात काही नवल वाटायला नको... 
सिनेमात अनेक एन्टरटेनिंग एलिमेंट असल्यामुळे क्लासमेट्स तुम्हाला बांधून ठेवतो. पण काही ठिकाणी, हा सिनेमा आपला वेग गमावतो... आणि थोडा स्लो वाटतो... अनेक ठिकाणी एडिटिंगमध्येही चुका जाणवतात... पण सिनेमातले परफॉर्मन्स पाहता, यातले संवाद आणि एन्टरटेनिंग एलिमेंटस् पाहता आम्ही या सिनेमाला मी देतोय ३.५ स्टार्स...
 

ट्रेलर पाहा...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.