फिल्म रिव्ह्यू : लांबलचक 'हायवे'... प्रयोगांचा 'सेल्फी'

Updated: Aug 29, 2015, 12:04 PM IST
फिल्म रिव्ह्यू : लांबलचक 'हायवे'... प्रयोगांचा 'सेल्फी' title=

 

चित्रपट : हायवे... एक सेल्फी आरपार (मराठी सिनेमा)
निर्माता : विनय वामन गनू
दिग्दर्शक : उमेश कुलकर्णी
लेखक : गिरीश कुलकर्णी
कलाकार : गिरीश कुलकर्णी, हुमा कुरेशी, टीस्का चोप्रा, रेणुका शहाणे-राणा, मुक्ता बर्वे, सुनिल बर्वे, किशोर कदम, किशोर चौगुले, श्रीकांत यादव, मयुर खांडगे, पूर्वा पवार

मुंबई : 'हायवे' हा मराठी सिनेमा सिल्वर स्क्रीनवर झळकलाय. या सिनेमाविषयी अनेक दिवसांपासून उत्सूकता होती. या सिनेमात गिरीश कुलकर्णी, मुक्ता बर्व, रेणुका शहाणे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, सुनिल बर्वे अशी कलाकारांची भली मोठी फौज या सिनेमात पहायला मिळतेय. 

प्रत्येक पात्राचा वेगळा प्रवास
हायवे या सिनेमात जवळ जवळ ४० पात्र आहेत.. यातला प्रत्येक कॅरेक्टर एक प्रवासी आहे, प्रत्येकाचं एक बॅगेज आहे. प्रत्येकाची एक गोष्ट आहे आणि प्रत्येक जण कसल्यातरी शोधात आहे. या सिनेमाची ब्युटी म्हणजे संपूर्ण सिनेमा हा गाडीत चित्रीत करण्यात आलाय. सिनेमा सुरुवातीपासून शेवटापर्यंत हायवेवरच शूट करण्यात आलाय. त्यामुळे हायवेच्या निमित्तानं काही नवीन एक्सपेरीमेन्ट्स मराठी रुपेरी पडद्यावर पहायला मिळतात.


हुमा कुरेशी (हायवे)

सिनेमाचं कथानक
या सिनेमातली कथा ही शब्दात सांगणं खूपच कठिण आहे. कारण 'कथा' या गोष्टीचं एक वेगळं डेफिनेशन गिरीश कुलकर्णीनं यात मांडलंय. यात एक एन आर आय तरुण आहे जो आपल्या आजारी वडिलांना शेवटचं भेटायला अमेरिकेहून मुंबईला आलाय. तर एकीकडे एक तमाशात काम करणारी बाई आहे जी आपला प्रवास गाठतेय.. एक अत्यंत साधी गृहीणी आपल्या नवऱ्यासोबत प्रवास करतेय तर दुसरीकडे एक अत्यंत श्रीमंत घरातली हाय प्रोफाइल स्री एका वेगळ्याच कामासाठी प्रवास करतेय. या सिनेमात असे अनेक प्रवासी आहेत जे आपआपलं बॅगेज घेऊन प्रवास करताना दिसतात.

दिग्दर्शन आणि अभिनय 
अभिनेता गिरीश कुलकर्णीनं या सिनेमाची कथा लिहिली असून, अत्यंत वेगळ्या पद्धतीनं खरंतर 'कथा', या सिनेमातल्या अतिशय महत्त्वाच्या एलिमेंटचं डेफिनेशन जरा वेगळ्या पद्धतीनं या सिनेमात मांडलंय. 'हायवे' या सिनेमात अनेक एक्सपेरीमेन्ट्स करण्यात आलेत.. ज्याचं क्रेडिट खरंतर दिग्दर्शक उमेश कुलकर्णीला द्यायलाच हवं.. सिनेमाची मांडणी, कथेची हाताळणी या सगळ्या गोष्टी छान झाल्यात.. रेणुका शहाणे, मुक्ता बर्वे, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, टिस्का चोप्रा, सुनिल बर्वे, हुमा कुरेशी या नटांनी सुरेख अभिनय केलाय.


मुक्ता बर्वे (हायवे)

सिनेमा बघताना रंजक वाटतो पण एक गोष्ट जी या सिनेमात खटकते ती म्हणजे सिनमाचा शेवट जो खुपच लांबलाय.. सिनेमाचा उत्तरार्थ हा थोडासा लांबलाय ज्यामुळे काही क्षणांसाठी सिनेमा बोअरिंग जाणवतो. याचबरोबर हायवे हा एक वेगळ्या धाडणीचा सिनेमा आहे.. यात उत्तम संवाद आणि कलाकारांचे दमदार परफॉरमेन्सही पहायला मिळतात. गिरीश कुलकर्णी या नटानं आजवर ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारीत सिनेमे जास्त केलेत, या सिनेमात त्यानं एका एनआरआयची व्यक्तिरेखा साकारली आहे, जी नक्कीच त्याच्यासाठी एक चेलेंज असेल, त्याचा अभिनय छान झालाय.

या सिनेमात अनेक नवे प्रयोग केले असले तरी हा मसालापट नाही, त्यामुळे या सिनेमाचे काही ठराविक प्रेक्षकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही... यामुळेच, आम्ही या सिनेमाला देतोय ३.५ स्टार्स...
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.