नॅशनल अॅवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार, कतरिना कैफचा खुलासा

'फँटम' गर्ल कतरिना कैफ आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत कधी साखरपुडा तर कधी लग्नासाठी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र आपल्या लग्नाच्या प्रश्नावर कतरिना कैफनं गमतीशीर उत्तर दिलंय.

Updated: Aug 27, 2015, 11:26 PM IST
नॅशनल अॅवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार, कतरिना कैफचा खुलासा title=

मुंबई: 'फँटम' गर्ल कतरिना कैफ आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत कधी साखरपुडा तर कधी लग्नासाठी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र आपल्या लग्नाच्या प्रश्नावर कतरिना कैफनं गमतीशीर उत्तर दिलंय.

आणखी वाचा - ...जेव्हा एकाच ठिकाणी आले रणबीर, कतरीना आणि सलमान!

इंडिया टुडे टिव्हीवर आपला आगामी चित्रपट फँटमच्या प्रमोशनसाठी आली असता कतरिनानं इंटरव्ह्यूमध्ये तिच्या लग्नाबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. ती म्हणाली, 'मला वाटलं होतंच आपण हा प्रश्न विचाराल आणि माझा अंदाज खरा ठरला. मी पहिलेच ठरवलं होतं याचं एक गमतीशीर उत्तर द्यायचं.' कतरिना म्हणते, 'जेव्हा मी नॅशनल अॅवॉर्ड जिंकेल तेव्हा लग्न करेल. जर माझ्या चित्रपटानं नॅशनल अॅवॉर्ड जिंकला आणि मी वैयक्तिक स्तरावर जिंकू शकली नाही, तरीही मी लग्न करीन.'\

आणखी वाचा -  सैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी

सैफ अली खान सोबत चित्रपट फँटममध्ये कतरिना लीड रोलमध्ये आहे. सध्या आपलं संपूर्ण लक्ष करिअरवर असून लग्नाबाबत अजून विचार केला नसल्याचं ती म्हणाली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.