सलमानची बहिण अर्पिताबद्दल या पाच गोष्टी तुम्हाला माहितीय?

बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मासोबत मंगळवारी हैदराबादमध्ये धुमधडाक्यात झालं. अर्पिता सलमानची लाडकी बहिण असली तरी खूप कमी लोकांना माहितीय की, अर्पिता सलमानची सख्खी बहिण नाहीय. 

Updated: Nov 19, 2014, 11:20 AM IST
सलमानची बहिण अर्पिताबद्दल या पाच गोष्टी तुम्हाला माहितीय? title=

मुंबई: बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मासोबत मंगळवारी हैदराबादमध्ये धुमधडाक्यात झालं. अर्पिता सलमानची लाडकी बहिण असली तरी खूप कमी लोकांना माहितीय की, अर्पिता सलमानची सख्खी बहिण नाहीय. 

१) एका रिपोर्टनुसार अर्पिता खानच्या आईचा मुंबईतील फुटपाथवर मृत्यू झाला होता. अर्पिताला सलीम खाननं दत्तक घेतलं आणि आपल्या घरात मुलीसारखं वाढवलं. तेव्हापासून तिन्ही भावांची सलमान, अरबाज, सोहेलची अर्पिता लाडकी बहिण झाली.  

२) असंही सांगण्यात येतं की, अर्पिताला सलमानचे वडील सलीम खान यांनी दत्तक घेतलं. सलीम खाननं हेलनसोबत दुसरं लग्न केल्यानंतर त्यांना मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी आणि हेलननी अर्पिताला दत्तक घेतलं आणि घरी आणलं. 

३) तर अर्पिताबद्दल तिसरी कथा म्हणजे हेलनला आपल्या घराबाहेर अर्पिता लहानपणी खूप गंभीर स्थितीत फुटपाथवर रडतांना सापडली. हेलननं तिला आपल्या मुलीसारखं वाढवलं आणि सलमान खानच्या कुटुंबात ती सदस्य झाली.
 
४) रिपोर्टनुसार अर्पिता खान आपली आई सलमा खान आणि भाऊ सोहेल खानच्या अधिक जवळ आहे. जेव्हाही अर्पिताला कोणत्या सल्ल्याची गरज पडते तेव्हा ती वडील सलीम खान यांच्याकडे जाते. 

५) अर्पितानं लंडनहून फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंगचा कोर्स केलाय आणि त्यानंतर तिला भारताचा बिझनेस इंटरनॅशनल लेव्हलवर पोहोचवायचाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.