मुंबई: समलैंगिकताच्या अधिकारांवर एक टिपिकल बॉलिवूड स्टाइल व्हिडिओ प्रसिद्ध झालाय ज्यात अभिनेत्री सेलिना जेटली आहे. युनायटेड नेशंसचा सर्वाधिक व्हायरल झालेला आणि बघितला गेलेला हा व्हिडिओ झालाय. या म्यूजिकल व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक जणांनी पाहिलंय.
होमोफोबियाच्या विरोधात सुरू असलेल्या संघर्षाचा दरम्यान यूएननं हा व्हिडिओ एप्रिल 2014मध्ये रिलीज केला होता. 'द वेलकम' हे टायटल असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा जो आपल्या बॉयफ्रेंडला पहिल्यांदा आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी आणतो, हे दाखवलंय.
ऑफिस हाय कमिशन ऑफ ह्युमन राइट्सचे चार्ल्स रेडक्लिफ यांनी मागील मंगळवारी ट्वीट करून हे सांगितलं की, हा व्हिडिओ यूएनचा सर्वाधिक बघितला गेलेला व्हिडिओ झालाय. लेस्बियन, गे, बायसेक्सुअल आणि ट्रांसजेडर लोकांसाठी समतेसाठी अभियान आणि होमोफोबियाच्या समाप्तीच्या उद्देशानं हा अडीच मिनीटांचा व्हिडिओ बनवला गेलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.