'हेट स्टोरी ३'ने केली ९.७२ कोटींची कमाई

बोल्ड आणि हॉट सीन्समुळे 'हेट स्टोरी ३' हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत होता. अखेर शुक्रवारी ४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झालाय. चित्रपटांच्या ट्रेलरमध्ये तसेच गाण्यांमध्ये अनेक हॉट सीन्सचा भरणा होता. त्यामुळे सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. 

Updated: Dec 5, 2015, 01:34 PM IST
'हेट स्टोरी ३'ने केली ९.७२ कोटींची कमाई title=

नवी दिल्ली : बोल्ड आणि हॉट सीन्समुळे 'हेट स्टोरी ३' हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत होता. अखेर शुक्रवारी ४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झालाय. चित्रपटांच्या ट्रेलरमध्ये तसेच गाण्यांमध्ये अनेक हॉट सीन्सचा भरणा होता. त्यामुळे सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. 

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली. देशभरातील तब्बल २६९० चित्रपटगृहांत हा चित्रपट दाखवण्यात आला होता. याचा फायदा कमाईवर झाला. 

या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.७२ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या दोन्ही दिवशी चांगली कमाई होईल अशी आशा व्यक्त केली जातेय. या चित्रपटात शर्मन जोशी, झरीन खान, करणसिंग ग्रोवर आणि ड़ेझी शाह यांच्या भूमिका आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.