पुणे : शशांक केतकर (श्री) आणि तेजश्री प्रधान (जान्हवी) यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला असून, त्यांचा दावा प्रथम समुपदेशनासाठी ठेवला जाणार आहे.
यानंतर "होणार सून मी या घरची‘ मालिकेत पती-पत्नीची भूमिका साकारतानाच प्रत्यक्षात विवाहबंधनात अडकलेलं "श्री व जान्हवी‘ हे अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय असणार जोडपं, अता विभक्त होणार की त्यांची मने पुन्हा जुळणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मालिकेत अभिनय करतानाच ते दोघे गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले आणि एक वर्ष संसार झाल्यानंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले.
शशांकने घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. त्याबाबत हे दोघेही नुकतेच न्यायालयासमोर हजर झाले. दोघांची बाजू समजून घेतल्यानंतर त्यांच्यात समेट घडविण्याचा प्रयत्न केला जाईल.
तो प्रयत्न कितपत यशस्वी होईल, हे आत्ता सांगता येणार नाही. या दोघांचे दोन-तीन वेळा समुपदेशन झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
संबंधित चित्रमालिकेच्या कथानकातही हे जोडपे घटस्फोटापर्यंत पोहचले होते, त्यामध्ये त्यांची मने जुळली. हे लोकप्रिय जोडपे वास्तव जीवनात पुन्हा एकत्र येणार का, त्यांची मने पुन्हा जुळणार का, याची उत्तरे लवकरच मिळू शकतील. या मालिकेशी संबंधित "काही हं श्री‘ हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.