ऋतिक रोशनकडून कंगनाची पाठराखण

ऋतिक रोशन आणि कंगना रणावत यांच्यामधला वाद विकोपाला पोहोचला होता.

Updated: May 1, 2016, 08:31 PM IST
ऋतिक रोशनकडून कंगनाची पाठराखण title=

मुंबई: ऋतिक रोशन आणि कंगना रणावत यांच्यामधला वाद विकोपाला पोहोचला होता. या दोघांनीही एकमेकांना कायदेशीर नोटीसही पाठवल्या होत्या. पण आता चक्क ऋतिकनं कंगनाची पाठराखण केली आहे. 

कंगनाही चारित्र्यहिन आणि प्रसिद्धीसाठी हापापलेली असल्याची टीका ट्विटरवर काही जणांनी केली होती. त्यावरून ऋतिकनं कंगनाची बाजू घेतली आहे. दुसऱ्यांच्या चारित्र्यावर टीका करणं म्हणजे चारित्र्यहिनपणा आहे. राग सोडा आणि प्रेम करा, असं ट्विट ऋतिकनं केलं आहे. 

 

आता या ट्विटमुळे तरी या दोघांमधला वाद मिटेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऋतिकचा उल्लेख कंगनानं सिली एक्स असा केला होता, त्यामुळे भडकलेल्या ऋतिकनं कंगनाला नोटीस पाठवून माफी मागायची मागणी केली होती. कंगनानंही यानंतर माफी मागायला नकार देत ऋतिकला नोटीस पाठवली.