मुंबई: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं आपल्या चाहत्याची माफी मागितली आहे. मुंबई विमानतळावर अक्षयचा एक चाहता त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा अक्षयच्या बॉ़डीगार्डनं या चाहत्याला ठोसा मारला. या सगळ्या प्रकाराबद्दल अक्षयनं दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच मी माझ्या बॉडीगार्डलाही तंबी दिल्याचं अक्षयनं म्हंटलं आहे.
अक्षय कुमारनं याबाबतचं ट्विट केलं आहे. झाल्या प्रकाराबद्दल मला काहीच कल्पना नव्हती, पण अचानक गोंधळ सुरु झाला, माझ्या बॉडीगार्डनं एका चाहत्याला मारल्याचं मला कळलं, असं व्हायला नको होतं, असं ट्विट अक्षयनं केलं आहे.
या प्रकरणाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, बॉडीगार्डलाही मी पुन्हा असं न करण्यास सांगितलं आहे, प्रत्येक चाहता माझ्यासाठी मोलाचा आहे, असा प्रकार भविष्यात होणार नाही, असंही अक्षय म्हणाला आहे.