मुंबई : सिने अभिनेता आणि बॉलिवूडचा डॉन समोर आल्यानंतर आपल्या मुलांना त्याची कशी ओळख करून द्यावी, असा प्रश्न पडला होता अभिनेता ऋतिक रोशनला...
मुंबई विमानतळावर अचानक शाहरुख आणि हृतिक रोशनची भेट झाली. यावेळी हृतिकसोबत त्याची दोन मुलं रिदान आणि रिहानंही होतं.
शाहरुखची आपल्या मुलांना 'अंकल' म्हणून ओळख करून द्यावी... की पूर्ण नावानं.. की आणखी काही... असा यक्षप्रश्न यावेळी हृतिकला पडला होता.
dilemma! Didnt no hw 2 introduce @iamsrk 2 my boys! 2 cool 4 uncle,full name,1st name- not respectful. Man of love- 2 long!Need help.Ideas?
— Hrithik Roshan (@iHrithik) June 12, 2015
४१ वर्षीय अभिनेता हृतिकनं आपली ही दुविधा सोशल वेबसाईट ट्विटरवरून आपल्या चाहत्यांशीही शेअर केलीय... इतकंच नाही तर त्यांना सल्लाही विचारलाय.
४९ वर्षीय अभिनेता शाहरुखनंही ट्विट करून हृतिक आणि त्याच्या दोन चिमुरड्यांना भेटून आनंद झाल्याचं ट्विटरवर म्हटलंय. हृतिक आपल्या मुलांसोबत सुट्टीचा वेळ घालवण्यासाठी जातोय, हे पाहून आनंद झाला असं शाहरुखनं म्हटलंय.
Battery died on trimmer so part of Raees still on face. Happy to c lil Hrithiks with their dad on way for a holiday. pic.twitter.com/8QdeWoXTuR
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 11, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.