सुझाननं बॉयफ्रेंड अर्जुनसोबत नाईट क्लबमध्ये वाढदिवस साजरा केला?

अर्जुन रामपाल आणि आपल्या संबंधांचा सुझान आणि तिच्या आईनं कितीही वेळा नाकारलं तरीदेखील या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीत... आता, तर सिने जगतात अशीही चर्चा सुरू आहे की, अभिनेता ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझाननं आपला वाढदिवस अर्जुनसोबतच सेलिब्रेट केला. 

Updated: Oct 29, 2015, 12:45 PM IST
सुझाननं बॉयफ्रेंड अर्जुनसोबत नाईट क्लबमध्ये वाढदिवस साजरा केला?

नवी दिल्ली : अर्जुन रामपाल आणि आपल्या संबंधांचा सुझान आणि तिच्या आईनं कितीही वेळा नाकारलं तरीदेखील या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीत... आता, तर सिने जगतात अशीही चर्चा सुरू आहे की, अभिनेता ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझाननं आपला वाढदिवस अर्जुनसोबतच सेलिब्रेट केला. 

26 ऑक्टोबर हा सुझानचा वाढदिवस... यंदा तिनं आपला 37 वा वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसोबत म्हणजे आई जरीन खान, वडील संजय, भाऊ - बहिण आणि दोन्ही मुलं रेहान-रिधान यांच्यासोबत साजरा केला... आणि त्यानंतर अर्जुन रामपालसोबतही.

अधिक वाचा - Gossip : हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझान करणार दुसरं लग्न

मुख्य म्हणजे, यावेळी अर्जुन शिलाँगमध्ये आपल्या 'रॉक ऑन 2' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. पण, तो लवकर लवकर शुटींग आटपून लगेचच मुंबईसाठी रवाना झाला... कारण, त्याला सुझानचा वाढदिवस वाढदिवस चुकवायचा नव्हता.    

अधिक वाचा - घटस्फोटानंतर हृतिक-पूजाची वाढतेय जवळीक

आपल्या कुटुंबीयांनंतर सुझाननं आपला वाढदिवस आपल्या काही मित्रमंडळींसोबतही साजरा केला. यामध्ये अर्जुनचाही समावेश होता. एका नाईट क्लबमध्ये सुझान-अर्जुननं हे सेलिब्रेशन केलं, अशी चर्चा आहे.

अधिक वाचा - सुझानच्या दुसऱ्या लग्नावर अर्जुनची प्रतिक्रिया...

यापूर्वी अनेकदा सुझान आणि अर्जुनला एकत्र पाहिलं गेलंय... परंतु, दोघांनीही अनेकदा आपल्या संबंधांचा नकार केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.