मुंबई : नुकताच लव्हबर्डस रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'बाल्कनी किसिंग' फोटो व्हायरल झाला होता. या फोटोबद्दलच एका कार्यक्रमात कतरिनाला काही पत्रकारांनी छेडलं... तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत कतरिना 'फितूर' या चित्रपटात दिसणार आहे. याच सिनेमाच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये कतरिनाला या सिनेमाच्या पोस्टरची रिअल आयुष्यात दिलेल्या पोझबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा पहिल्यांदा कतरिनानं या फोटोवर बोलणं टाळलं.
पण, पत्रकारांनी पिच्छा पुरवल्यानंतर कतरिनानं 'आपल्या आवडत्या व्यक्तीनं आपल्याला मिठी मारणं केव्हाही चांगलंच वाटतं' अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.