मुंबई : शुक्रवारी रात्री 'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जी ही तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. तिने आत्महत्या केल्याचे पुढे निष्पन्न झाले. तिच्या आत्महत्येच्या बातमीनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले.
तिचा बॉयफ्रेंड राज सिंग याच्याशी झालेल्या भांडणानंतर तिने मृत्यूला कवटाळल्याचे तर्क काहींनी लावले. तिचे शेवटचे व्हॉट्सअॅप स्टेटसही सूचक होते. दरम्यान राज फरार असल्याचेही काही माध्यमांनी सांगितले. आता मात्र या प्रकरणात नवा खुलासा होतो आहे.
एबीपी न्यूजने दिलेल्या बातमीत मुंबई पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राज फरार नसून आमच्या संपर्कात असल्याचे पोलिसांचे म्हणणे
आहे. पण, सध्या तो कुठे आहे याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. पण, प्रत्युषाच्या आत्महत्येबाबत प्रत्येक तासाला एक नवा खुलासा होत आहे.