व्हिडिओ : 'ऑनलाईन संवादातून' भारत-पाकिस्तानचा सुरेल मिलाप

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर भारत आणि पाकिस्तानचा सुरेल मिलाप रसिकांच्या भेटीला आलाय.    

Updated: Aug 16, 2014, 11:11 AM IST
व्हिडिओ : 'ऑनलाईन संवादातून' भारत-पाकिस्तानचा सुरेल मिलाप title=

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर भारत आणि पाकिस्तानचा सुरेल मिलाप रसिकांच्या भेटीला आलाय.    

व्यक्तीला खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळतं जेव्हा त्याचं मन द्वेष, लालसा आणि सूड अशा भावनांतून मुक्त होतं, असा संदेश या गाण्यातून देण्यात आलाय. ‘रंग रसिया’ या गाण्यातून प्रेम आणि मैत्रीचा संदेश देण्यात आलाय. 

भारत-पाकिस्तान दरम्यान मैत्रीचा पूल आणखी भक्कम करण्यासाठी भारतानं पुढाकार घेऊन अनेक पाकिस्तानी कलाकारांना यात सहभागी केलंय. एका गाण्याच्या माध्यमातून हा मैत्रीचा पूल भक्कम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 

भारतीय बॅन्ड ‘माती बानी’नं स्वातंत्र्यदिनाचं निमित्त साधत ‘रंग रसिया’ हे गाणं अनेक पाकिस्तानी कलाकारांसोबत रसिकांसमोर आणलंय. ‘माती बानी’ म्हणजे... मातीची भाषा... 2012 मध्ये गिटारिस्ट कार्तिक शाह, गायिका निराला कार्तिक यांनी हा बॅन्ड सुरू केला होता. गंमत म्हणजे या कलाकारांनी एकमेकांशी ‘केवळ ऑनलाईन संवाद’ साधत हे गाणं तयार केलंय. 

व्हिडिओ पाहा :

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.