पियूषने मनीष पॉलला लगावल्या २० थप्पड

अभिनेता पियूष मिश्रा लवकरच 'तेरे बिन लादेन - डेड ऑर अलाइव' या चित्रपटात दिसणार आहे. खलीली नावाची व्यक्तिरेखा तो या चित्रपटात करतोय, 

Updated: Feb 4, 2016, 03:18 PM IST
पियूषने मनीष पॉलला लगावल्या २० थप्पड title=

मुंबई : अभिनेता पियूष मिश्रा लवकरच 'तेरे बिन लादेन - डेड ऑर अलाइव' या चित्रपटात दिसणार आहे. खलीली नावाची व्यक्तिरेखा तो या चित्रपटात करतोय, 

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये पियुषला मनीषच्या थोबाडीत लावायची होती. एकदा हा सीन झाला. मात्र या सीनने दिग्दर्शक अभिषेक शर्मा संतुष्ट झाले नाहीत. त्यांनी पुन्हा रीटेक घेतला. अखेर सीन ओके होईपर्यंत मनीषला तब्बल २० थप्पड खाव्या लागल्या होत्या. 

या सीननंतर दुसऱ्या दिवशी मनीषला सुट्टी घ्यावी लागली कारण त्याचा चेहरा पूर्ण सूजला होता. येत्या १९ फेब्रवारीला 'तेरे बिन लादेन-डेड ओर अलाइव' प्रदर्शित होतोय. यात मनीषसह सिंकदर खेर, प्रद्युम्न सिंह यांच्याही भूमिका आहेत.