पूजा बेदी वडिलांच्या चौथ्या विवाहाबद्दल होती नाखूश.. पण...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीने १६ जानेवारीला आपल्या ७०व्या वाढदिवशी त्यांची मैत्रीण आणि ब्रिटीश अभिनेत्री परवीन दुसांजशी विवाह केला.

Updated: Jan 18, 2016, 08:51 PM IST
पूजा बेदी वडिलांच्या चौथ्या विवाहाबद्दल होती नाखूश.. पण... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीने १६ जानेवारीला आपल्या ७०व्या वाढदिवशी त्यांची मैत्रीण आणि ब्रिटीश अभिनेत्री परवीन दुसांजशी विवाह केला. हा त्यांचा चौथा विवाह आहे. 

कबीर बेदींची कन्या पूजा बेदी मात्र या विवाहावर नाखुश होती. याविषयी तिने एक ट्वीटही केलं होतं. ते ट्वीट आता डिलीट करून आता तिने आपल्या वडीलांना शुभेच्छा दिल्या आहेत. 



पूजाने आधी केलेलं ट्वीट असं होतं - 'प्रत्येक परीकथेत एक चेटकीण किंवा सावत्र आई असते. माझ्या आयुष्यात आता एक आली आहे.'



नवीन ट्वीटमध्ये ती म्हणते - 'मी माझं आधीचं ट्वीट डीलिट केलं आहे. आता सकारात्मक विचाक करत मी दोघांना शुभेच्छा देते'.





कबीरचा वैवाहिक इतिहास 

- कबीरचं पहिलं लग्न नृत्यांगना प्रोतिमा बेदीशी झालं होतं. जिच्यापासून त्यांना सिद्धार्थ आणि पूजा ही दोन मुलं झाली. यानंतर कबीर अभिनेत्री परवीन बाबीसोबत लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहिले होते. 



- कबीरचं दुसरं लग्न ब्रिटिश फॅशन डिझाइनर सुझेन हम्फ्रेसशी झालं होतं. दोघांना एक अॅडम नावाचा मुलगा झाला जो इंटरनॅशनल मॉडेल आहे. कबीरचा नंतर घटस्फोट झाला. 



- कबीरचं तिसरं लग्न रेडीओ आणि टीव्ही प्रेझेंटर निक्कीशी झालं होतं. २००५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 



- आता कबीर बेदीने १६ जानेवारीला आपल्या ७०व्या वाढदिवशी त्यांची मैत्रीण आणि ब्रिटीश अभिनेत्री परवीन दुसांजशी चौथा विवाह केला आहे.