बॉलीवूडमध्ये येण्याआधी रणवीर सिंगची पहिली ऑडिशन

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याने आपल्या सहज-सुंदर अभिनयाने अनेकांची मने जिंकलीत. खान हिरोंप्रमाणेच त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीत आपली विशेष ओळख निर्माण केलीय.

Updated: Jul 24, 2016, 09:28 AM IST
बॉलीवूडमध्ये येण्याआधी रणवीर सिंगची पहिली ऑडिशन title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याने आपल्या सहज-सुंदर अभिनयाने अनेकांची मने जिंकलीत. खान हिरोंप्रमाणेच त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीत आपली विशेष ओळख निर्माण केलीय.

बॉजीराव मस्तानीमधील त्याच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले. बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वर्षातच त्याने चांगले नाव कमावलेय.

त्याचा हा प्रवास नक्कीच सोपा नसेल. बॉलीवूडमध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी त्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागलीये.  बॉलीवूडमध्ये प्रवेश कऱण्याआधी रणवीर सिंगने कशी ऑडिशन दिली होती ते पाहा.