मुंबई: रणबीर आणि दीपिका, एक्स बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असलेल्या या दोघांनी एकमेकांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. रणबीर कपूरचं कतरिना कैफबरोबर ब्रेक अप झाल्यानंतर झालेल्या या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण या भेटीमागचं सत्य आता समोर आलं आहे.
रणबीर आणि दीपिका हे दोघं पुन्हा एकदा चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत बोलण्यासाठीच हे दोघं एकमेकांना भेटले असल्याचं बोललं जात आहे.
रणबीर आणि दीपिकामध्ये ब्रेक अपनंतरही चांगली मैत्री कायम आहे. त्यांनी ब्रेक अप झाल्यानंतरही 2 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. या दोघांनी शेवटचं एकत्र काम केलेला तमाशा चित्रपट मात्र फारसा चालला नाही.