सैराट दक्षिणेतही रिलीज होणार

महाराष्ट्र, दुबई, आणि अमेरिकेतील थिेएटरमध्ये धुमाकूळ घालणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट आता दक्षिणेतील थिएटरमध्ये रिलीज होण्यास सज्ज झालाय.

Updated: Jun 9, 2016, 02:47 PM IST
सैराट दक्षिणेतही रिलीज होणार title=

मुंबई : महाराष्ट्र, दुबई, आणि अमेरिकेतील थिेएटरमध्ये धुमाकूळ घालणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट आता दक्षिणेतील थिएटरमध्ये रिलीज होण्यास सज्ज झालाय.

चेन्नई आणि केरळमध्ये आता हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्यामुळे तेथील बॉक्स ऑफिसवर कसा धुमाकूळ घालतो याची उत्सुकता आहे. 

29 एप्रिलला हा सिनेमा रिलीज झालाय. आतापर्यंत या सिनेमाने 80 कोटीहून अधिक कमाई केलीये. लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश यात शंकाच नाही.

केरळ आणि चेन्नईमध्ये हा सिनेमा आता दाखवला जाणार आहे. शुक्रवारी केरळमधील थिएटरमध्ये तर शऩिवारी चेन्नईमध्ये रिलीज होणार आहे. येथे सैराटचे लिमिटेड शोज दाखवले जाणार आहेत.