नवी दिल्ली : सलमानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांचं लग्न हे २०१४ मधील सर्वात मोठा विवाह सोहळा म्हणून ओळखला जाणार आहे. येत्या १८ नोव्हेंबरला दोघंही लग्नाचा बेडीत अडकणार आहेत. त्यापूर्वी जाणून घेऊयात त्यांची लव्हस्टोरी.
अर्पिता खान ही लेखक सलीम खान यांची मुलगी, अभिनेता सलमान खान, अरबाज आणि सोहेल यांची बहीण सर्वाचीच लाडकी. आयुष शर्मा हा दिल्लीतील एका मोठ्या बिझनेसमनचा मुलगा, लग्नानंतर मुंबईत राहण्याच्या विचारात आहे.
लव्हस्टोरी..
अर्पिता आणि आयुष ह्या दोघांचीही भेट झाली ती २०१३मध्ये कॉमन मित्रमैत्रीणींमुळे. त्यानंतर त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं. थोड्याच काळात त्यांच्या नात्याला दोघांच्या घरून सहमती मिळाली आणि हे लव्हबर्ड्स लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्यास तयार झाले.
अर्पिता आणि आयुषची लग्नपत्रिका..
पांढऱ्याशुभ्र लग्नपत्रिकेत अर्पिता आणि आयुषचं नाव सोनेरी अक्षरांनी लिहिलं गेलंय. या लग्नपत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे आमंत्रणावेळीस लग्नपत्रिकेसोबत दिले जाणारे स्पेशल कपकेक्स.
विवाह स्थळ..
हैदाराबाद इथल्या ताज फलकनूमा या हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार होणार आहे.
मान्यवर..
या विवाहसोहळ्याला मोठमोठ्या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. खास बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी या विवाहसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर बी टाऊनचे सगळे तारे या विवाहाला उपस्थित राहतील. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आमिर खान, हृतिक रोशन, दिपिका पादुकोण, करिना कपूर, सैफ अली खान, करण जोहर, कतरिना कैफ, हेमा मालिनी, धमेंद्र, साजिद नाडीयाडवाला यांसारखे मान्यवर कार्यक्रमात चार चाँद लावतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.