वकील हितेशसोबत संजयने काढला पहिला सेल्फी

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आपली शिक्षा पूर्ण केल्यानंतर गुरुवारी सकाळी येरवडा तुरुंगातून बाहेर आला. संजयच्या सुटकेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेय. त्याच्या स्वागतसाठी पत्नी मान्यता, राजकुमार, हिरानी तसेच त्याचे चाहते तुरुंगाबाहेर होते. 

Updated: Feb 25, 2016, 04:08 PM IST
वकील हितेशसोबत संजयने काढला पहिला सेल्फी title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आपली शिक्षा पूर्ण केल्यानंतर गुरुवारी सकाळी येरवडा तुरुंगातून बाहेर आला. संजयच्या सुटकेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेय. त्याच्या स्वागतसाठी पत्नी मान्यता, राजकुमार, हिरानी तसेच त्याचे चाहते तुरुंगाबाहेर होते. 

तेथून कारमध्ये बसून संजय चार्टड विमानाने मुंबईत पोहोचला. संजयच्या सुटकेनंतर त्याचा पहिला सेल्फीचा फोटो समोर आलाय. 

या सेल्फीमध्ये त्याची पत्नी अथवा कुटंबिय नसून त्याचे वकील हितेश जैन दिसत आहे. सेल्फीमध्ये संजय रिलॅक्स मूडमध्ये दिसतोय.

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा झालेला संजय दत्त येरवाडा तुरुंगातून शिक्षा पूर्ण करुन बाहेर पडला. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याची १८ महिन्यांची शिक्षा कमी करण्यात आली.