बालपणीच्या मित्रासोबत श्रेया विवाहबंधनात अडकली!

गायिका श्रेया घोषाल तिचा आपला लहानपणीचा मित्र शिलादित्यसोबत विवाहबंधनात अडकलीय. उल्लेखनीय म्हणजे, हा विवाहसोहळा अत्यंत गुप्त पद्धतीनं पार पाडण्यात आला.

Updated: Feb 6, 2015, 12:57 PM IST
बालपणीच्या मित्रासोबत श्रेया विवाहबंधनात अडकली!

मुंबई : गायिका श्रेया घोषाल तिचा आपला लहानपणीचा मित्र शिलादित्यसोबत विवाहबंधनात अडकलीय. उल्लेखनीय म्हणजे, हा विवाहसोहळा अत्यंत गुप्त पद्धतीनं पार पाडण्यात आला.

या विवाह सोहळ्यात निवडक आणि जवळच्या नातेवाईकांनाच निमंत्रित करण्यात आलं होतं. बंगाली रितीरिवाजानं काल रात्री श्रेया-शिलादित्यचा विवाह सोहळा पार पडला. 

ही गोष्ट श्रेयानंच सोशल वेबसाईट ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलीय. ट्विटरवर एका फोटोसोबत 'काल रात्री नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत मी माझ्या प्रेमासोबत - आदित्यसोबत विवाह जीवनात प्रवेश केलाय. आयुष्यातल्या नव्या रोमांचासाठी खूप उत्साहित आहे' असं श्रेयानं म्हटलंय. 

या फोटोमध्ये श्रेया लाल रंगाच्या साडीत दिसतेय. तर 'हिपकास्क डॉट कॉम'चा संस्थापक शिलादित्यनं सफेद रंगाचा पोशाख चढवलेला दिसतोय

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.