सुल्तानची भारतात आतापर्यंत २७४.४५ कोटींची कमाई

सलमान आणि अनुष्का स्टारर सुल्तानची जादू अद्यापही बॉक्स ऑफिसवरुन ओसरलेली नाही. 

Updated: Jul 22, 2016, 10:22 AM IST
सुल्तानची भारतात आतापर्यंत २७४.४५ कोटींची कमाई  title=

मुंबई : सलमान आणि अनुष्का स्टारर सुल्तानची जादू अद्यापही बॉक्स ऑफिसवरुन ओसरलेली नाही. 

या सिनेमाने भारतात आतापर्यंत २७४.४५ कोटींची कमाई केलीये. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज करण्यात आला. त्यानंतर पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली.

या सिनेमासाठी एकूण ९० कोटी खर्च झाला. या खर्चाच्या तुलनेत सिनेमाने तीनपट अधिक कमाई केलीये. त्यामुळे खर्च तर वसूल झालाच मात्र त्याचबरोबर मोठा फायदाही झालाय.