कपिलसोबत भांडणानंतर येथे परफॉर्म करणार सुनील ग्रोवर

'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्माचे सहकारी त्याला सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. कपिल शर्मा आणि सहकाऱ्यांमधला वाद आता टोकाला पोहोचला आहे. सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही. पण सुनील ग्रोवर १ एप्रिलपासून दिल्लीमध्ये लाईव्ह शो परफॉर्म करणार आहे. सुनील ग्रोवर सोबत किकू शारदा देखील परफॉर्म करणार आहे. 

Updated: Mar 26, 2017, 02:30 PM IST
कपिलसोबत भांडणानंतर येथे परफॉर्म करणार सुनील ग्रोवर title=

मुंबई : 'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिल शर्माचे सहकारी त्याला सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. कपिल शर्मा आणि सहकाऱ्यांमधला वाद आता टोकाला पोहोचला आहे. सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील वाद अजूनही संपलेला नाही. पण सुनील ग्रोवर १ एप्रिलपासून दिल्लीमध्ये लाईव्ह शो परफॉर्म करणार आहे. सुनील ग्रोवर सोबत किकू शारदा देखील परफॉर्म करणार आहे. 

सुनील ग्रोवरने फेसबुक पोस्टवरुन याची माहिती दिली आहे. या शोचं नाव 'द कपिल शर्मा शो' नाही तर डॉक्टर मशहूर गुलाटीज कॉमेडी क्लिनिक आहे. हा दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये होणार आहे.