सुनिल ग्रोवर आणि सनी लियोनी करणार एकत्र काम

कपिल शर्मा सोबत झालेल्या वादानंतर आता सुनिल ग्रोवरचे अच्छे दिन सुरु झाल्याचे दिसतेय. त्याचा दिल्लीमधील लाईव्ह शो सुपरहिट ठरला तर दुसरीकडे मात्र कपिलला त्याचा शो अवघ्या १० मिनिटांत आटोपता घ्यावा लागला.

Intern Intern | Updated: Apr 10, 2017, 11:15 AM IST
सुनिल ग्रोवर आणि सनी लियोनी करणार एकत्र काम title=

मुंबई : कपिल शर्मा सोबत झालेल्या वादानंतर आता सुनिल ग्रोवरचे अच्छे दिन सुरु झाल्याचे दिसतेय. त्याचा दिल्लीमधील लाईव्ह शो सुपरहिट ठरला तर दुसरीकडे मात्र कपिलला त्याचा शो अवघ्या १० मिनिटांत आटोपता घ्यावा लागला.

'द कपिल शर्मा शो'च्या घसरत चाललेल्या टीआरपीमुळे चॅनेल हा शो बंद कऱण्याच्या तयारीत आहे. त्यासोबत चॅनेल एक नवा शो आणण्याबाबत विचार करतेय या शोमध्ये सुनील लीड रोलमध्ये असणार आहे.

त्यासोबतच सुनील ग्रोव्हर आता आयपीएलमध्येही दिसणार आहे. त्यामध्ये सुनिल युसी न्युजसाठी कॉमेंट्ररी करणार आहे. १३ तारखेला होणाऱ्या शाहरुख खानची टीम कोलकाता नाइट राइडर्स आणि प्रिती झिंटाची टीम किंग्स इलेव्हन पंजाब यांच्या मध्ये होणाऱ्या सामन्यात सुनिल कॉमेंट्री करणार आहे.

सुनिल ग्रोवरने ट्वीटरवर एक वीडीओही शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने अभिनेत्री सनी लियोनीही त्याच्यासोबत युसी न्युजसाठी कमेंटरी करणार असल्याचे सांगितले आहे.