मुंबई : माजी पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हीनं आपल्या आगामी चित्रपट 'मस्तीजादे'बाबत नुकताच एक खुलासा केलाय. या सिनेमाचे काही सीन्स शूट करताना काही वेळेस सनीही 'अनकम्फर्टेबल' झाली होती.
भारतात पहिल्यांदाच अडल्ट कॉमेडी करणाऱ्या सनी लिऑनने 'मस्तीजादे' करताना आपण चित्रपटातील काही प्रसंगांविषयी 'अनकम्फर्टेबल' असल्याचं म्हटलंय.
चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यावर त्यातील काही डायलॉग आणि प्रसंग यांच्याशी आपण कम्फर्टेबल नव्हतो. दिग्दर्शक मिलाप झवेरीला यांना आपण याबद्दल सांगितलं. त्यानंतर त्यांनी आपलं मत लक्षात घेऊन त्यात काही बदल केले, असंही सनीनं म्हटलंय.
लिली आणि लैला अशा दुहेरी भूमिकेत सनी या चित्रपटात दिसणार आहे. ही दोन्ही पात्रे एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. पण संपूर्ण टीमने शुटींगचे ज्या पद्धतीने आयोजन केले होते त्यामुळेच हे काम करणं सोप्पं झालं, असं तिनं म्हटलंय.
भारतात जास्तीत जास्त अडल्ट कॉमेडी चित्रपट काढून याविषयी समाजात मान्यता निर्माण केली जावी, असं सनीचं मत आहे. सनी लिऑन, तुषार कपूर आणि वीर दासची प्रमुख भूमिका असलेला 'मस्तीजादे' हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय.