मुंबई : २०१६ मध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. त्यामध्ये नुकताच सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा देखील ब्रेकअप घाल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक अशा जोड्या होत्या ज्यांनी यश मिळाल्यानंतर ब्रेकअप केला आहे.
१. टाइगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आता समोर येत आहेत.
२. सोनाक्षी सध्या सिंगल आहे पण हिंदी सिनेमामध्ये येण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हा ही आदित्य श्रॉफ सोबत रिलेशनशिपमध्ये होती पण तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवताच त्यांच्यातलं नातं संपलं.
३. दीपिका पदुकोन आणि निहार पांड्या मॉडलिंगच्या वेळेस दोघेही सोबत होते. पण ओम शांती ओमनंतर रणबीर कपूरसोबत बचना ए हसीनो हा सिनेमा तिला मिळाला आणि तिचं आणि रणबीरचं अफेयर शुरू झालं. निहारला तिने सोडून दिलं.
४. प्रियंका चोपडा पण या यादीमध्ये आहे. मिस वर्ल्ड बनण्याआधी ती एका मॉडेलला डेट करत होती पण बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर असीमला सोडत ती पुढे निघून गेली.
५. आलिया भट्ट आणि अली दादरकर यांच्यातील संबंध देखील खूप जुने होते. पण यश मिळताच आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्राचं अफेयर सुरु झालं.
६. रणबीर कपूर आणि अवंतिका मलिक हे देखील अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते पण यश मिळण सुरु होताच सोनम कपूर, दीपिका, कैटरीना ही नावं देखील त्याच्यासोबत जोडली गेली.
७. करिअर सुरु होण्यापूर्वी अनुष्का जोहेब युसूफसोबत रिलेशनमध्ये होती पण लेडीज वर्सेज रिकी बहल या सिनेमानंतर रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा रिलेशनशिपमध्ये आले.
८. ऐश्वर्या राय-बच्चन या अभिनेत्रीचं पण नाव या यादीमध्ये आहे. राजीव मूलचंदानी सोबत तिचं अफेअर होतं पण सलमानसोबत जवळीकता वाढत गेली आणि राजीव तिच्या लाईफमधून निघून गेला.