मुंबई : अभिनेता विनोद खन्ना यांचं मुंबईत निधन झालं आहे, मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने विनोद खन्ना यांचं निधन झालं आहे. विनोद खन्ना हे ७० वर्षांचे होते.
बॉलीवूडचा विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी पाकिस्तानमधील पेशावरमध्ये झाला. किशनचंद खन्ना आणि कमल खन्ना यांच्या मुलाने बॉलीवूडमध्ये आपली प्रतिभा निर्माण केली. विनोद खन्नाने मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून ग्रॅज्यूएशन केलं.
सुनील दत्त यांच्या मन की बात या सिनेमात १९८६ साली विनोद खन्नाने खलनायकाची भूमिका केली होती. खलनायकाची भूमिका करून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या या अभिनेत्याने नंतर सत्तर आणि ऐंशींचं दशक गाजवलं. पूरब और पश्चिम, सच्चा झुठा आणि मेरा गाव मेरा देश या सिनेमातही विनोद खन्नाच्या भूमिका गाजल्या.
विनोद खन्नाने १९९७ साली पहिल्यांदा भाजपकडून खासदारकीची निवडणूक लढवली आणि गुरूदासपूरमधून खासदार म्हणून निव़डून आले. विनोद खन्ना हे २००२ साली केंद्रात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री होते, यानंतर त्यांनी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळला.