व्हिडिओ: 'स्पेशल २६', 'हॉलिडे', 'बेबी' नंतर आता अक्षयचा 'एअरलिफ्ट', टीझर रिलीज

सुपरस्टार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'एअरलिफ्ट'चं टीझर रिलीज झालंय. पहिलं रूप पाहूनच हा चित्रपटही खिलाडी किंगच्या बेबी आणि स्पेशल २६ सारखा आणखी एक जबरदस्त चित्रपट असल्याचं दिसतंय.

Updated: Nov 18, 2015, 10:47 AM IST
व्हिडिओ: 'स्पेशल २६', 'हॉलिडे', 'बेबी' नंतर आता अक्षयचा 'एअरलिफ्ट', टीझर रिलीज title=

मुंबई: सुपरस्टार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'एअरलिफ्ट'चं टीझर रिलीज झालंय. पहिलं रूप पाहूनच हा चित्रपटही खिलाडी किंगच्या बेबी आणि स्पेशल २६ सारखा आणखी एक जबरदस्त चित्रपट असल्याचं दिसतंय.

'एअरलिफ्ट' १९९०-९१ इराक-कुवैत युद्धादरम्यान कुवैतमध्ये अडकलेल्या भारतीयांवर आधारित आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राजा कृष्णा मेनन यांनी केलंय. अक्षय सोबत चित्रपटात 'लंच बॉक्स' चित्रपटातील अभिनेत्री निमरत कौर सुद्धा आहे. 

अक्षय कुमारनं टीझर लॉन्च करत ट्विटरवर लिहिलं, हा चित्रपट खूप खास आहे आणि प्रेक्षकांना तो नक्की आवडेल. 

आणखी वाचा - अक्षय कुमार पुन्हा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, ४० लाखांची मदत

हा चित्रपट १९९०च्या सत्यघटनेवर आधारित आहे. यात अक्षयनं कुवैतचा भारतीय बिझनेसमन रणजीतची भूमिका साकारलीय. त्याला जेव्हा कळतं की, त्याचे लोक संकटात आहेत तेव्हा तो कुवैतमध्ये अडकलेल्या १,७०,००० भारतीयांना सुरक्षित कसं ठेवता येईल याच्या प्रयत्नात लागतो. रणजीतच्या मदतीनं हे भारतीय इराकच्या हल्ल्यातून कसे वाचतात त्यासाठी किती किलोमीटरचा प्रवास करून ते अम्माम पोहोचतात. जिथं मानवी इतिहासातील सर्वात मोठं पलायन होतं.

टीझरपूर्वी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये एक विमान रनवेवरून उडतांना दिसतंय. लादेश धूम्रपान करत धूर उडवतांना दिसतो... आणि पोस्टरवर लिहिलंय.. '१,७०,००० शरणार्थी, ४८८ विमान, ५९ दिवस आणि एक माणूस.'

अक्षयनं पोस्टर शेअर करत चित्रपट रिलीजची माहिती दिली. २२ जानेवारी २०१६ ला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.