व्हिडिओ: पाहा खुनशी वरूण धवनच्या ‘बदलापूर’चा फर्स्ट लूक

रोमँटिक भूमिका करणाऱ्या वरुण धवनचा पहिल्यांदाच खुनशी अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या ‘बदलापूर’ सिनेमाचा पहिला टिझर लॉन्च झालाय. 

Updated: Dec 2, 2014, 02:37 PM IST
व्हिडिओ: पाहा खुनशी वरूण धवनच्या ‘बदलापूर’चा फर्स्ट लूक title=

मुंबई: रोमँटिक भूमिका करणाऱ्या वरुण धवनचा पहिल्यांदाच खुनशी अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या ‘बदलापूर’ सिनेमाचा पहिला टिझर लॉन्च झालाय. 

या टिझरवरून आपल्याला हे नक्की दिसून येतं की, यात वरुण आपल्याला रोमॅन्टिंग हिरोच्या रूपात दिसणार नाही. चित्रपटात बदला, शिक्षा असे विविध शेड्स आपल्याला पाहायला मिळतील. 

चित्रपटातील वरूणचा लूक हा शाहीद कपूरच्या ‘हैदर’च्या लूक सारखा वाटतोय. यात हुमा कुरेशी आणि यामी गौतम महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोबतच विनय पाठक आणि नवाझुद्दीन सिद्धीकी आणि दिव्या दत्ताही आहेत. 

२० फेब्रुवारी २०१५ला बदलापूर रिलीज होणार आहे. 

पाहा ‘बदलाPUR’चा व्हिडिओ – 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.