मुंबई : बॉलीवूडमधील झीनत अमान एक अशी हिरोईन आहे जिचे लाखो फॅन्स होते. 70, 80च्या दशकात बॉलीवूडमध्ये त्याच्या सुंदरतेचा जलवा होता. मात्र एक असा व्यक्ती होता ज्याने झीनतशी लग्न केले नंतर घटस्फोट घेतला आणि सर्वांसमोर झीनत अमान हिला मारलेही.
80च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगत. त्यादरम्यानच्या काळात मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. संजय खान आणि झीनत नेहमी पार्टी अथवा कार्यक्रमात एकत्र दिसत. त्यावेळी संजय खान यांचे लग्न झाले होते मात्र तरीही ते झीनतसोबत एकत्र दिसत.
मात्र 1979मध्ये या दोघांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा होत्या. याचदरम्यान दोघांनी अब्दुल्ला या सिनेमात एकत्र काम केले होते. चित्रपटाचे शूटिंग झाल्यानंतर झीनत दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाली. त्यावेळी संजय यांनी फोनवरुन झीनतला गाणे शूट कऱण्यास सांगितले. मात्र व्यस्त शेड्यूल्डमुळे झीनतने नकार दिला.
झीनतच्या नकारामुळे संजय भडकले त्यांनी झीनतला खूप बरेवाईट सुनावले. संजयचा फोन ठेवल्यावर घाबरुन झीनत त्यांच्या घरी गेली. त्यावेळी संजय फाईव्ह स्टोर हॉटेलमध्ये गेल्याचे झीनतला कळले. झीनत तेथे पोहोचली. एका मॅगॅझिनमध्ये आलेल्या वृत्तानुसार चिडलेल्या संजय खान यांनी रागात झीनत यांना मारहाण केली. यानंतर मात्र त्या दोघांचे नाते तुटले. त्यानंतर 1995मध्ये झीनतने मजहर खान यांच्याशी लग्न केले.