जळगाव : अमळनेर शहरात बोगस वोटिंगसाठी ८ ते १० हजार जण दाखल झाल्याचा आरोप भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी केला आहेराष्ट्रवादीचे उमेदवार साहेबराव पाटील, तसेच अनिल भाईदास पाटील यांनी या प्रकरणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणं मांडलं आहे.
अपक्ष उमेदवारावर पैसे वाटपाचा आरोप
अमळनेर विधानसभा मतदारसंघ यावेळी वेगळ्याच कारणाने गाजतोय. अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शिरीष चौधरी यांच्यावर पैसे वाटप आणि मोठ्या प्रमाणात बोगस मतदान केल्याचा आरोप केला आहे.
८० लाख जप्त
अमळनेरात काही दिवसांपूर्वी पाटील प्लाझा या लॉजमधून ८० लाख रूपये जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली होती, यानंतर अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी देखिल अटक झाली, शिरीष चौधरी यांची त्यानंतर जामीनावर सुटका करण्यात आली.
९ बोगस वोटर्स ताब्यात
अमळनेर शहरात आज ९ बोगस वोटर्सना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या लोकांनी बोगस वोटिंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
या बोगस वोटिंग करणाऱ्यांवर काहीही कारवाई झालेली नाही, तसेच पोलिस प्रशासन आणि निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांचं संगनमत झाल्याचा आरोप भाजपचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.