काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, आश्वासनांची खैरात!

महाराष्ट्रातला रणसंग्राम रंगतदार अवस्थेत असताना आज राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचाही जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. राज्यातल्या नववी पास असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना टॅब देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. 

Updated: Oct 2, 2014, 07:29 PM IST
काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, आश्वासनांची खैरात! title=

मुंबई: महाराष्ट्रातला रणसंग्राम रंगतदार अवस्थेत असताना आज राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचाही जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. राज्यातल्या नववी पास असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना टॅब देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. 

तर मुंबईतले पाच एन्ट्रीचे टोलनाके बंद करण्याचा उल्लेखही जाहीरनाम्यात करण्यात आलाय. काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करण्याच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे उपस्थित होते.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे- 

  • मुंबईत येताना लागणारे पाच टोलनाके बंद करणार - काँग्रेसचा जाहीरनामा

  • पुणे व नागपूरमध्ये आयआयटी पार्क उभारणार - काँग्रेसचा जाहीरनामा

  • पाच वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी एक लाख घरं बांधणार.

  • ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६५ वरुन ६० वर्षांवर आणणार - काँग्रेसचा जाहीरनामा

  • राज्यातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यांनी जोडणार - काँग्रेसचा जाहीरनामा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.