आबांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध!

निवडणूक आयोगाकडून आबांना दिलासा मिळालाय. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय.  निवडणूक आयोगानं भाजप उमेदावारानं केलेला अर्ज फेटाळलाय. मात्र अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. 

Updated: Sep 29, 2014, 04:32 PM IST
आबांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध! title=

सांगली: निवडणूक आयोगाकडून आबांना दिलासा मिळालाय. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय.  निवडणूक आयोगानं भाजप उमेदावारानं केलेला अर्ज फेटाळलाय. मात्र अजून याची अधिकृत घोषणा झालेली नाही. 

आर. आर. पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपानं आक्षेप घेतला होता. आबांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बेळगावमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा उल्लेख नसल्याचं सांगत भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला होता. 

त्यामुळं अधिकाऱ्यांनी आबांचा उमेदवारी अर्ज बाजूला ठेवला होता. त्यामुळं आबांची उमेदवारी धोक्यात आली की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता उमेदवारी अर्ज वैध ठरल्याचं समजतंय.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून भाजपकडून अजित घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.