कल्याण : परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टीका करतांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला असला, भाजपला अफझलखानाची फौज म्हटल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी उद्धव ठाकरे यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
मात्र "बाळासाहेब हयात असतांना, त्यांना कुटुंब एकसंध ठेवता आलं नाही", असं खळबळजनक वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केलं आहे.
बाळासाहेब हयात असतांना त्यांना कुटूंब एकसंध ठेवता आलं नाही, त्याचं प्रमाणे राजकीय युत्या बनतात आणि तुटतात, आम्ही मातोश्रीचा आदर करतो, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात बोलणारी नाही, असंही नंतर सुषमा स्वराज म्हणाल्या.
उद्धव यांना मी सांगेन निवडणुका चार दिवसांच्या असतात, जरा संयम बाळगा, लोकशाही आहे, उद्या सभागृहात एकत्र बसायचं आहे, असं सुषमा स्वराज यांनी कल्याणमध्ये जाहीर सभेत बोलतांना सांगितलं.
बाळासाहेब, सुषमा स्वराज आणि पंतप्रधानपद
पंतप्रधानपदासाठी बाळासाहेबांनी सुषमा स्वराज यांच्या नावाला पसंती दिली होती, मात्र बाळासाहेब हयात असतांना, त्यांना कुटुंब एकसंध ठेवता आलं नाही, अशाच राजकीय युत्या बनतात, आणि तुटतात, असं खळबळजनक वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.