मुंबई : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एकापाठोपाठ एक निर्णयांचा धडाका सुरुच ठेवलाय.
रात्रपाळीदरम्यान कामावर असताना डुलकी काढणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांवर मुंढे यांनी निलंबनाची कारवाई केलीये. पुणे स्टेशन आणि कोथरुड डेपोमध्ये गाडयांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामावर असलेले ९ कर्मचारी ऑनड्युटी झोपले होते.
ही गोष्ट मुंढे यांना समजल्यानंतर या कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित कऱण्यात आलेय. याआधीही मुंढे यांनी कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला होता. उशिरा आलेल्या तब्बल ११७ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला होता. तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेतही बदल करण्यात आलाय.