बोईसरमध्ये खड्ड्याने घेतला विद्यार्थ्यांचा बळी

 पालघर तालुक्यातल्या  बोईसरमध्ये  दहावीत  शिकणा-या आशिष यादव या 14 वर्षांच्या विद्यार्थ्याचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला.  

Updated: Jul 17, 2014, 08:38 AM IST
बोईसरमध्ये खड्ड्याने घेतला विद्यार्थ्यांचा बळी title=

बोईसर : पालघर तालुक्यातल्या  बोईसरमध्ये  दहावीत  शिकणा-या आशिष यादव या 14 वर्षांच्या विद्यार्थ्याचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला.  

आशिष सायकलनं  शाळेत जात असताना  बोइसर रेल्वेच्या एमआयडीसी माल वाहतूक टर्मिनससमोर  रस्त्यावर पडलेल्या खडयामध्ये त्याच्या सायकलचे पुढचे चाक रुतले. यामुळे त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यातचं पडला. त्याचवेळी  पाठीमागून येणाऱ्या कंटेनरचे  चाक आशिषच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. 

याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कंटेनरच्या  चालकावर गुन्हा दाखल  झालाय . चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेतायेत तसंच  आशिषच्या या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम  विभाग आणि खैरापाडा  ग्रामपंचायत  ही तितकीच  जबाबदार आहे, असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.