यवतमाळ : कळंब येथील शिवशक्ती विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. याप्रकरणी आरोप असणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे पुढे आलेय.
वस्तीगृहातून काढण्याची धमकी देवून या मुलीचे शोषण करण्यात आले आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे पिडीत मुलीला वसतिगृह पाहारेकरी भगतसिंग सोनार हाच आरोपी राहुल काळे याच्यासोबत संबंध प्रस्थापित करायला लावत होता. तसेच वसतिगृह अधिक्षिका लता सांडे ही देखील प्रकाराला मूक संमती देत होती, असे तक्रारीत नमूद आहे.
वस्तीगृहातून काढण्याची धमकी देत राहुल काळे आणि त्याचा साथीदार वसतिगृह पाहारेकरी भगतसिंग सोनार यांनी तिचे शारिरीक शोषण केले. यात ती विद्यार्थी सहा महिन्याची गरोदर राहिली. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर चीड व्यक्त होत आहे. कळंब पोलिसांनी तिघां विरुद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा, अँट्रासिटी आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.