कल्याणमध्ये बाइक चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफ़ाश
एका तरुणासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक १३ बाईक हस्तगत
विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण : यूट्यूबवरील बाईक चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याप्रमाणे बाईक चोरी करणाऱ्या एका टोळीचा कोळसेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे .
पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळी मधील एका तरुणासह दोन अल्पवयीन आरोपींना जेरबंद केले आहे. अमीर अब्बास आली सय्यद असे या तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्व येथे राहतो. तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून १३ बाईक हस्तगत केल्या आहेत
अधिक वाचा : धक्कादायक : गाडी धुण्यासाठी वापरणारा प्रेशर पंप गुदद्वारात टाकल्याने मृ्त्यू
कल्याण पूर्वे परिसरात काही दिवसांपासून बाईक चोरी होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली होती. त्यातच १० दिवसांपूर्वी चिंचपाडा परिसरातून एक अॅक्टीव्हा चोरी गेल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस स्थानकात दाखल झाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला असता पोलिसांना एक गॅरेज चालविणाऱ्या अमीर अब्बास अली सय्यदवर संशय आला..
पोलिसांनी तात्काळ त्याला चौकशी साठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हे कबूल केला. त्याच्या चौकाशीतून पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या एका टोळीला बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तब्बल १३ बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा : बिबट्याची मान चक्क हंड्यात अडकली
या टोळीने आतापर्यंत कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, भिवंडी शहर, महात्मा फुले, वसई-विरार, कोपरी (ठाणे), बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये या बाईक चोऱ्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली. या चोरलेल्या बाईक अत्यल्प म्हणजेच केवळ २-३ हजार रुपयांत विकण्याच्या तयारीत होते. मात्र तत्पूर्वी कोळसेवाडी पोलिसांनी त्यांना अटक केली.
विशेष म्हणजे या गुन्ह्यातील एकाला सोडून बाकी दोन आरोपी हे अल्पवयीन असून युट्यूबवर बाईक चोरीचा व्हिडीओ पाहून ही टोळी बाईक चोरी करायची. काही तरुण इंटरनेट यूट्यूबमधील व्हिडियो पाहून गुन्ह्यांची जणू ट्रेनिंग घेत असल्याचे दिसून आले आहे. ही मुले सुद्धा यूट्यूब मधील व्हिडियो पाहून बाईकची चोरी करायची असे पोलिस उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.