सांगली : सांगलीत एका आईवर आज आपलं मुलं मंत्र्याच्या पायावर ठेवण्याची वेळ आली.
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या पायावर दुष्काळग्रस्त महिलेनं आपलं तान्हं मुल ठेवलं.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जतमधल्या नागरिकांनी आंदोलन केलं. पालकमंत्र्यांना यावेळी घेराव घालण्यात आला.
दुष्काळग्रस्तांच्या समस्या सोडवण्यापेक्षा अतिक्रमण हटवण्यात प्रशासन धन्यता मानतंय. पुनर्वसन करा मग अतिक्रमण हटवा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दुष्काळाप्रश्नी पालकमंत्र्यांनी जतकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जतच्या नागरिकांनी केलाय.