पुणे : अजित पवार हे त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते बोलतात त्याच्या ब्रेकींग न्यूज होतात. मात्र आता त्यांनी नसतां वाद टाळण्याचं ठरवलय. त्यासाठी बोलताना तोलून मापून बोलणार असल्याचं ते सांगतात.
आता मी तोलुन मापून बोलणार म्हणजे असं...आम्ही गावकडे म्हणतो की कुणाच्या बापाला घाबरण्याच कारण नाही पण आता तस नाही बोलायचे ...आता असं म्हणायच की... नाही मी कुणाच्या वडिलांना घाबरणार नाही, मी कुणाच्या डॅडींना घाबरणार नाही. बापाला घाबरणार नाही म्हटलं की तुम्ही म्हणता अजित पवारची जीभ घसरली, पण वडीलांना घाबरणार नाही असं म्हटलं की तुम्ही जीभ घसरली असं म्हणत नाही आणि डॅडींना घाबरत नाही असं म्हटलं की तर अजिबातच म्हणत नाही की जीभ घसरली.
पुण्यातील भाजपचे खासदार संजय काकडे हे धंदेवाईक असल्याची टीका अजित पवार यांनी केलीय. ते जिकडे सत्ता तिकडे जातात असा टोला त्यांनी काकडेना लगावलाय.
काही व्यक्ती आपलं काही तरी काम व्हावं यासाठी ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्या दारात उभ्या राहतात. अशा व्यक्तींना धंदेवाईक म्हणतात. संजय काकडे अपक्षांच्या जीवावर खासदार झाल्यावर त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला आणि काँग्रेसशी संलग्न असल्याचे सांगितले. पुढे केंद्रातील मनमोहन सिंगांच सरकार गेल की ते भाजपशी संलग्न झाले. पुढे मोदींचे सरकार गेल्यावर ज्या पक्षाच सरकार येईल त्या पक्षाशी ते संलग्न होतील.