सातारा : शरद पवार हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. पवारांचे आणि सर्वच पक्षांचे सलोख्याचे संबध आहेत. आणि राष्ट्रपती पदासाठी निवडण्यात येणारी व्यक्ती ही सर्वसमावेशक असावी म्हणूनच पवारसाहेबांच्या नावाची चर्चा सुरु आहे अशी भुमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मांड़ली.
अजित पवार सध्या संघर्ष यात्रेनिमित्त साता-यात आहेत. अजित पवारांच्या या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसची पवारांच्या राष्ट्रपतीच्या नावाला सकारात्मक संकेत असल्याचे बोललं जातय.