कोणाच्या हाफ पँटबद्दल बोलले अजितदादा ?

मी यांना अनेक पदांसह फुलपँट दिली, पण त्यांनी हाफ पँट चढवली,

Updated: Jan 22, 2016, 03:36 PM IST
 कोणाच्या हाफ पँटबद्दल बोलले अजितदादा ?

पिंपरी: मी यांना अनेक पदांसह फुलपँट दिली, पण त्यांनी हाफ पँट चढवली, असा टोला अजित पवारांनी लक्ष्मण जगताप यांना लगावलाय. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती, असंही अजित पवार म्हणालेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या वेगवेगळ्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन अजित पवार यांनी केलं.. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये अजितदादांनी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर हल्ला चढवला.

या सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. आमचे पंतप्रधान बहुतेकवेळा परदेशामध्येच असतात. त्यांचे फोटो असलेल्या जाहिरातींवर भाजपनं साडेआठशे कोटी रुपयांचा चुराडा केला, अशी टीका अजितदादांनी केलीये. तसंच आम्ही कधीही मंदिराच्या नावानं मत मागितली नसल्याचंही अजितदादा म्हणाले.