कल्याण : पूर्वेकडील कटेमानिवली जवळ 12 वर्षांच्या मुलाचा किल्ला बनविताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.
अनिकेत शंकर लोणकर असं या मुलाचं नाव असून, गड किल्ले बनवत असताना त्याला विजेचा शॉक लागला होता. गुरुवार संध्याकाळची ही घटना आहे. त्यामुळे मुलांच्या खेळण्यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज यातून स्पष्ट झाली आहे.
ऐन दिवाळीत दु:खत घटना घडल्याने लोणकर कुटुंबीयांवर डोंगर कोसळला आहे.