अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमक देण्यात आली असली तरी अशा धमक्यांना अण्णा भिक घालत नाहीत हे आणखी एकदा स्पष्ट झालं आहे. फेसबुकच्या माध्यमातून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
अण्णांच्या सुरक्षा रक्षकांची संख्या १६ वरुन २६ करण्यात आली आहे. तसंच आणखी एक एक्सॉर्ट गाडीही अण्णांच्या ताफ्यात देण्यात आली आहे. धमकी विषयी बोलतांना अण्णा हजारे म्हणतात. “यापूर्वीही मला जीवे मारण्य़ाच्या धमक्या आल्या आहेत. माझं जीवन समाजाला समर्पित केलं आहे. त्यामुळं धमक्यांना मी घाबरत नाही.” असं अण्णांनी ठणकावलंय.
दरम्यान, नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अपयश आल्यानं समाजकंटकांच्या मनात भीतीचं राहिली नसल्याचं अण्णांनी म्हटलं. धमकी प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांनाही पत्र देण्यात आलं आहे.
अण्णांना कॅनडामध्ये राहणाऱ्या गगन विधू या अनिवासी भारतीयानं, भारतात येऊन जीवे मारण्याची धमकी फेसबुकवरुन दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.