राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 24 तारखेला जंतर- मंतवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यातील बदल शेतकरीविरोधी असल्याचं यापूर्वीच अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
जनलोकपाल विधेयक आणि भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात अण्णांनी आंदोलनाची हाक दिली आहे. अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.
अण्णांनी आज राळेगणसिद्धीमध्ये याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये केंद्र सरकारने वटहुकूमाच्या माध्यमातून बदल सुचविले आहेत. त्याला अण्णांचा विरोध आहे. यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहिलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.