पुणे : चौकात वाहतूक पोलीस नसेल तर, वाहतूक नियम मोडण्याचा मोह कोणालाही होतो… पुणेकरांना मात्र असं धाडस महागात पडणार आहे. कोणाचं लक्ष नाही असं पाहून वाहतूक नियम मोडला तरी, आता थेट तुमच्या घरी दंडाची पावती येणार आहे.
पुण्यातील अनेक चौकात सध्या असे सीसीटीव्ही लागले आहेत. हे सीसीटीव्ही वाहतूक पोलिसांचं काम करणार आहेत. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे, सिग्नल तोडणे, लेन कटींग, ट्रीपल सीट, नो पार्किंगमध्ये वाहन उभं करणे… वाहतुकीचा असा कोणताही नियम मोडला की थेट घरी दंडाची पावती आली म्हणून समाजाच...
वाहतूक पोलिसांबरोबर हुज्जत नाही की, दंड कमी करण्यासाठी घासाघीस, विनवण्या नाहीत. 'सीसीटीव्ही'चं काम देखील सुरु झालं आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ६० - ७० लोकांना सध्या दंडाच्या पावत्या पोचल्याही, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिलीय.
वाहतुकीला शिस्त लावण्यासोबतच गुन्हेगारांवरही या सीसीटीव्हीमधून लक्ष ठेवता येणार आहे. विशेषतः साखळी चोरांवर वचक ठेवण्यासाठी या सीसीटीव्हीचा उपयोग होणार आहे. शहरात असे आठशे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. लवकरच ही संख्या १५०० वर जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिलीय.
फक्त नाठाळ वाहन चालकांवरच नाही तर पोलिसांवरही या सीसीटीव्हीची नजर असणार आहे. वाहतूक पोलीस वेळेवर कामाच्या जागेवर हजर झालेत का…? त्यांची ड्युटी व्यवस्थित पार पडतायेत का? यावरदेखील सीसीटीव्हीमधून लक्ष असेल. त्यामुळं हे सीसीटीव्ही बहुगणी ठरणार आहेत हे नक्की…
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.