नवी मुंबई : माणसातल्या क्रूरतेचा भयंकर चेहरा नवी मुंबईतल्या खारघरमध्ये पाहायला मिळाला. खारघर सेक्टर दहामधल्या पूर्वा प्लेस्कूल अँड नर्सरीमधली ही संतापजनक घटना आहे.
या प्लेस्कूलमध्ये अवघ्या 10 महिन्यांच्या रितीशा सिन्हा हिला ठेवण्यात आलं होतं. तिथल्या अफसाना शेख नावाच्या कर्मचारी महिलेनं, या चिमुरडीला अत्यंत निर्दयीपणे जमिनीवर आपटलं. एवढ्यावरच न थांबता अफसानानं रितीशाला लाथेनंही मारहाण केली.
त्यात या चिमुकलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी खारघर पोलिसांनी अफसाना शेखला अटक केली असून, न्यायालयानं तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.